मुठवली खु. बी संघाने पटकावले विजेतेपद

| खांब-रोहा | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील छत्रपती शिवराय असोसिएशन पिंगळसई व मुठवली खु. यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्य विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुठवली खु. ब संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करीत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी उपसरपंच नथुराम मालुसरे, पत्रकार श्याम लोखंडे, युवा कार्यकर्ते महेश तुपकर, उपसरपंच योगेश शिंदे, गाव कमिटी अध्यक्ष सतीश ठाकूर, निलेश शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, वसंत भोईर (सरपंच) ग्रुप ग्रामपंचायत मालसई, तंटामुक्त अध्यक्ष घनश्याम कराळे, माजी सरपंच सतीश भगत, महेश बामुगडे, संतोष खेरटकर, महेंद्र पार्टे, कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, संतोष भोईर, हेमंत मालुसरे, शशिकांत कडू, रवींद्र देवरे, येनाजी शिंदे, शेखर कदम, सुशील घाटवल, राजेंद्र शेळके आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, स्पर्धेतील उपविजेतेपद मालसई संघाने पटकावले, तर लांढर संघ व जीसीसी पिंगळसई संघ यांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर, उत्कृष्ट गोलंदाज दिनेश मुटके, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनीष मुटके, पब्लिक हिरो महेश बारस्कर यांना तसेच विजेतेपद प्राप्त केलेल्या संघांना अनंत थिटे, संतोष खेरटकर, शशिकांत कडू, हेमंत मालुसरे, राम सावंत, महेश तुपकर, अमोल शिंगरे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version