ख्रिस्ती बांधवाचा माय दे देऊस उत्सव

ख्रिस्ती बांधवासह सर्व धर्मियाचे श्रध्दास्थान

| रेवदंडा | वार्ताहर |

रेवदंडयातील आगरकोट किल्ला, कोर्लई किल्ला व कोर्लई गावात आजही ऐतिहासिक चर्च प्राचीन पोर्तुगिज काळाची साक्ष देत आहेत. रेवदंडयातील माय दे देऊस हे चर्च सुध्दा या काळाचे साक्षीदार असून या मंदिरात ख्रिस्तीबांधव श्रध्दा व भक्तीने विविध उत्सव साजरे करते. प्रतिवर्षी पाच मे ला रेवदंडयातील माय दे देऊस उत्सव मोठया उत्साहाने साजरा करतात.

रेवदंडा गोळा स्टॉप नजीकच असलेले माय दे देऊस चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवासह सर्व धर्मियाचे श्रध्दास्थान आहे. चर्चला पत्राचे छप्पर असून कार्यक्रमासाठी उजव्या बाजूला मोकळी जागा असून तेथेच छोटेखानी व्यासपिठ आहे. समोरील बाजूस विहीर असून ही नवसाला पावणारी तसेच चमत्कार घडविणारी माऊली आहे असे सांगितले जाते. देवीच्या वास्तव्याने परिसरात रोगराई कधीच येत नाही अशी भक्तांची श्रध्दा आहे. वसई, मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणाहून भक्त मंडळी, विशेषतः ख्रिस्ती बांधव देवीचा दर्शनासाठी चर्चमध्ये येत असतात.

रविवार व बुधवारी देवीचा वार समजला जातो या दिवशी मंदिरात पुजाअर्चेसाठी भाविक येत असतात. येथे राहणारे हनी आयझॅक शहापुरकर हे नित्याने मेणबत्ती व पुजाअर्चा करीत असतात. प्राचीन काळापासून पाच मे ला या उत्सव साजरा करण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते. या चर्चमध्ये पाच मे च्या उत्सवापुर्वी नऊ दिवस अगोदर ख्रिस्ती बांधव सायकांळी प्रार्थना करतात. या नऊ दिवसात कोर्लई येथील ख्रिस्ती बांधव हे नऊ दिवस कोर्लई ते रेवदंडा असा पायीच चालत येत असतात. पाच मे रोजी कोर्लई सह संपुर्ण महाराष्ट्रात तसेच देश विदेशात विखुरलेले ख्रिस्ती बांधव माय दे देऊस उत्सवास येत असतात. या पाच मे माय दे देऊस उत्सवाचे निमित्ताने सकाळी ख्रिस्ती बांधव रेवदंडा गावातून पालखी सोहळा आयोजीत करतात. या पालखी सोहळयास उपस्थित ख्रिस्ती बांधवाचा सहभाग असतो. या देवीच्या पालखीस हिंदु धर्मिय श्रीफळ अर्पण करून देवीचे दर्शन घेतात. कोर्लई गावात 31 मे रोजी पालखी फिरवून रोगराई येऊ नये तसेच पीक उत्तम येऊन सुखशांती लाभावी यासाठी कोर्लई गावात या देवीची पालखी फिरविण्यात येते.

सन 1916 मध्ये अहमदनगरचा बुरहान निजामशहाने पोर्तुगिजांना वखार बांधण्यास तसेच श्रीमंत चौल बंदरात वावर करण्याची करण्याची परवानगी दिली. सन 1521 मध्ये विजापुरच्या आरमाराने चौल जाळले व पोर्तुगिजांचा पराभव केला. मात्र बुरहाने पोर्तुगिजांचा पराभव केला. तरीही बुरहानने पोर्तुगिजांशी मैत्री कायम ठेवली आणि लोअर चौल -रेवदंडा येथे किल्ला बांधण्यास परवानगी दिली. चौलच्या प्रांताधिकारी शेख मुहम्मद यांने विश्‍वासघात केल्याने दिवच्या प्रांताधिकारी मलिक यांनी खाडीच्या पलिकडे तिन महिने मुक्काम ठोकला आणि आगरकोट किल्ला बांधण्यास अडथळा आणला. सन 1524 मध्ये आगरकोट किल्लाचे बांधकाम पुर्ण झाले. या आगरकोट किल्लात सातखणी, तसेच पोर्तुगिजानी आठ चर्च बांधले. त्यापैकीच माय दे देऊस चर्च असून तो आजही उत्तम प्रकारे उभा आहे.

या माय दे देऊस देवीची आख्यायिका सांगितली जाते. रेवदंडयातील एका मच्छीमाराला समुद्रात मच्छी पकडताना जाळयामध्ये देवीची मुर्ती सापडली त्याने ती घरी आणली, तिची पुजा केली. रात्री देवीने स्वप्नात मच्छीमाराला दृष्टांत दिला आणि सांगितले मी ख्रिस्ती धर्मियांची देवता आहे त्यामुळे मंदिरा समान चर्च बांध, त्यानंतर हे चर्च बांधले गेले, चर्च कधी व कोणी बांधले यांची माहिती उपलब्ध नसली तरी चर्च पाचशे वर्षापुर्वीचे असावे असा स्थानिकांना अंदाज आहे.

Exit mobile version