माय-लेक बेपत्ता

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील सुरई आदिवासी वाडी येथून एक महिला आपल्या मुलीसह राहत्या घरातून न सांगता निघून गेली आहे. तिचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
पिंकी निलेश वाघमारे (25) ही तिची लहान मुलगी अनोखी वाघमारे (3) हिला घेऊन राहत्या घरातून न सांगता निघून गेली आहे. तिचा शोध नातेवाईकांनी घेतला असता सापडत नसल्याने अखेर हरविल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पिंकी वाघमारे हिचे वर्णन पुढीलप्रमाणे वय 25, उंची सुमारे 5.2 इंच, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस काळे लांब, डोळे काळे, अंगावर जांभळ्या रंगाची साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज, कानात सादे कुडे, गळ्यात मण्यांचे मंगळसूत्र, पायात चांदीचे पैंजण असे आहे. तर, अनोखी वाघमारे हिचे वय 3 वर्षे, उंची 2.5 फूट, अंगाने मध्यम, अंगात सफेद रंगाचा फ्रॉक, कानात चांदीच्या रिंगा असे वर्णन आहे. या वर्तनातील महिला व मुलगी कोठेही आढळल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन रेवदंडा पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version