ना. ना. पाटील संकुलामध्ये ध्वजारोहण

। भाकरवड । वार्ताहर ।
को.ए.सो. ना.ना. पाटील संकुल पोयनाड येथे कोरोना पार्श्‍वभूमीवर शासनाने घालून दिलेले नियम व अटी यांचे पालन करत भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन सोहळा कोएसो ज्येष्ठ संचालक पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. विद्यालयाचे प्राचार्य डी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, युवा नेते सुप्रभात पाटील, अंबेपुर सरपंच सुमना पाटील, उपसरपंच ममता पाटील, कोएसो सहमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक गावडे, शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, स्वप्नील पाटील, एस.के.पाटील, मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, पी.जी.भगत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनसीसी कमांडर समाधान भंडारे यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर शाळेतील संगीत शिक्षक राजेंद्र म्हात्रे आणि प्रकाश गोलीपकर यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून ध्वजगीत, ध्वजप्रतिज्ञा व देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले.

Exit mobile version