। श्रीवर्धन। प्रतिनिधी।
सुवर्णगणेश कबड्डी संघ,दिवेआगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत दर्यावर्दी नागाव बंदर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत जय हनुमान चरी, द्वितीय, शिवशंभो, पाटणेश्वर तृतीय तर मरीदेवी, धेरंड, चतुर्थ क्रमांक पटकाविले. या स्पर्धेत ओंकार मेस्त्री (नागाव) सर्वोत्कृष्ठ खेळाड, राहूल भोईर(चरी) उत्कृष्ट चढाई, अंकित खोत(नागाव) उत्कृष्ट चढाई असे पुरस्कार पटकाविले. .जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यात अलिबाग,पेण,महाड,रोहा,मुरुड तालुक्यातील एकुण सोळा संघ सहभागी झाले होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आयोजकांचे कौतुक केले. सामन्यां वेळी आदेश विरकुड, नरेप वारगे, कृष्णा वाघे, धोंडू बिराडी, रत्नाकर शिलकर, सुरेश डापले, प्रफुल्ल भाटकर, हेमंत पयेर, बबन घरत, हेमंत धनावडे, सुधीर वाणी, सचिन नाक्ती या राष्ट्रीय पंच तसेच प्रतिभावंत खेळाडूंचा सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मोहंमदभाई मेमन,सरपंच बाळकृष्ण बापट, प्रांतधिकारी अमित शेडगे, पोलीस निरीक्षक संदीप पोमण, विजय पटवर्धन, मंदार तोडणकर, सुचीन कीर हे मान्यवर उपस्थित होते.
नागावचा दर्यावर्दी कबड्डी स्पर्धेत अजिंक्य
