। श्रीगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील नागाव येथे दर्यावर्दी नागाव यांच्यावतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दि.9 मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधे श्रीगणेश दिवलांग संघ अंतिम विजेता ठरला.
तसेच या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक रायवाडी पांडवादेवी, तृतीय क्रमांक बजरंग बेली व चतुर्थ क्रमांक सोनारसिद्ध धाटाव यांनी मिळविले. स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू अमिर धुमाळ दिवलांग, सर्वोकृष्ट चढाई स्वप्निल वेळे, उत्कृष्ट पकड पार्थ ठाकूर, पब्लिक हिरो केदार यांचा सन्मान करण्यात आला. अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी दिवलांगच्या अमीर, सागर, प्रतिक, विनित, अक्षय, पार्थ, रत्नदीप या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. श्रीगणेश दिवलांग मंडळाचे अध्यक्ष अॅड.मनोज धुमाळ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.