| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील गवळ आळी येथील शिवसह्याद्री मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ गवळआळी यांच्यावतीने श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा बुधवार (दि.17) एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवसह्याद्री मित्रमंडळाकडून देण्यात आली. गवळ आळीतील या श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळ्याचे हे सलगपणे 14 वे वर्ष आहे.
गवळआळीतील श्री गणेश, राधाकृष्ण, श्री साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या श्री साईबाबा उत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक सात वाजता श्री साईबाबांना दुग्धअभिषेकाने होणार आहे. त्यानंतर अनेक धार्मिक पूजा विधी व होमहवन करण्यात येणार आहे. दुपारी ठीक 12.00 वा. श्री साईबाबांची महाआरती घेण्यात येईल. त्यानंतर भाविकांसाठी साई भंडारा होणार आहे. नंतर सायंकाळी 5 वाजता श्री साईबाबांच्या पालखी सोहळ्याची वाजत गाजत सुरुवात करण्यात येणार आहे. ही पालखी संपूर्ण गवळआळीत फिरविण्यात येईल. हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी विश्वस्त समितीचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसह्याद्री मित्र मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळ गवळआळी आणि सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व महिला भगिनींनी मेहनत घेत आहेत.