मुरुडचे नायब तहसीलदार एक दिवसीय सामुहिक रजेवर

| आगरदांडा | प्रतिनिधी |
राज्यातील व कोकण विभागातील सर्व नायब तहसीलदारांना इतर विभागातील समकक्ष पदांपेक्षा मिळणाऱ्या कमी वेतनविरोधात व प्रलंबित मागण्यासाठी एकदिवसीय सामुहिक रजेवर गेले असुन त्या संदर्भात मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे यांना रितसर निवेदन मुरुड नायब तहसीलदार -रविंद्र सानप, नायब तहसीलदार -गोविंद कोटंबे, निवडणूक नायब तहसीलदार- अमित पुरी यांनी दिले. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे वरिष्ठ अधिकारीच आज एकदिवसीय आंदोलनात सहभागी झाल्याने  मुरुड तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Exit mobile version