‘नैना’ला हद्दपार करणारच; बाळाराम पाटील यांचा निर्धार

| पनवेल | प्रतिनिधी |

नैनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे, रायगड ही अशी भूमी आहे की, येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाला यापूर्वीदेखील नमते घ्यावे लागले आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही. एकत्र आलो तर नैना हद्दपार करणारच, असा निर्धार यावेळी माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी केला.


आ. पाटील म्हणाले यांनी, यासाठी सर्वांनी राजकीय चपला बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. या सभेमध्ये विशेषतः तरुणांचा, महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कोणत्याही परिस्थितीत नैनाला वीतभर ही जागा देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. 2013 पासूनच सुरू असलेल्या या लढ्यामध्ये शेतकरी बांधवांचा निश्‍चितपणाने विजय होईल, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

नैना हा राक्षस असून तो आपल्याला विष पाजू इच्छितआहे. रायगड ही अशी भूमी आहे की, येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाला यापूर्वीदेखील नमते घ्यावे लागले आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही. एकत्र आलो तर नैना हद्दपार करणारच, असा निर्धार या वेळी शेतकर्‍यांनी केला. आपली पिकती जमीन नैना प्रकल्पाला द्यायची नाही, परिणामी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, असे सांगत नैना गो बॅकच्या घोषणा देत जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे, असे मत आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी व्यक्त केले.

लढाई पूर्वीही संपली नव्हती, आजही संपली नाही आणि उद्याही संपणार नाही. शेतकर्‍याला वेठीस धरण्याचे काम नैना करत असून, याविरोधात एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. राजकीय चपला बाजूला ठेऊन संघटित होऊया व आपल्या हिमतीवर आपण आपली जागा विकसित करू.

बाळाराम पाटील
Exit mobile version