। पनवेल । वार्ताहर ।
नवीन नियमानुसार मतदार यादीत छायाचित्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मतदार यादीत ते नसेल तर मतदाराची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. 188 पनवेल विधानसभा मतदार संघात 1 जानेवारी 2021 च्या अहर्तानुसार मतदार यादी फोटोसह पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार ज्यांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत. त्यांनी फोटो 31 जुलै पर्यंत निवडणूक विभाग तहसील पनवेल कार्यालयात आणून देणे अन्यथा मतदार यादीतून नावे वगलण्यात येणार असल्याचे प्रसिद्द करण्यात आले आहे.
188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 570 मतदार यादी आहेत. या मतदार यादीत 46066 मतदाराचे मतदान यादीत छायाचित्र नाही. त्यांच्याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी. तलाठी यांच्यामार्फत गृहभेटी दरम्यान सदर फोटो नसलेले मतदार तिथे राहात नसल्याचे समोर आले आहे. त्यांची नावे कटाक्षाने वगळली जाणार आहेत. मतदानाचे कर्तव्य पुढेही सहजतेने करता यावे, यासाठी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करुन तहसिल कार्यालयात जाऊन यादी पाहावी व ज्यांच्या नावापुढे छायाचित्रे नाही, अश्या मतदारांचे अशा मतदारांनी 31 जुलै 2021 पर्यंत फोटोमागे नाव लिहून गावातील, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तलाठी किंवा निवडणूक शाखा तहसील कार्यालय पनवेल जमा करावेत. छायाचित्र मतदान यादीमध्ये फोटो नसलेल्या मतदारांची यादी निवडणूक विभागाच्या वतीने वृत्तपत्रामध्ये 24 जुलै व 25 जुलै 2021 रोजी प्रसिद्द करण्यात आलेली आहेत. या नोटीसचे अवलोकन करावे. त्याचबरोबर फोटो नसलेल्या मतदारांनी लवकरात लवकर फोटो निवडणूक विभागात जमा करावे, असे आवाहन 188 पनवेल विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तात्रेय नवले यांनी केले आहे.