| कर्जत | प्रतिनिधी |
कुळ कायद्याचे जनक लोकनेते नारायण नागू पाटील यांचे सर्वच क्षेत्रात मोठे कार्य आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुळ कायद्याची अमलाबजावणी केली. मात्र, कुळ कायद्याचे ते जनक आहेत. कुळ कायदा करण्यासाठी त्यांना डॉ. बाबासागहेब आंबेडकर यांनी मोलाचे सहकार्य केले. गोर गरिबांसाठी त्यांनी ठीक ठिकाणी शाळा सुरु केल्या आहेत. परंतु, त्या शाळांची अवस्था आता काय आहे? गड किल्ल्यांसारख्या आपल्या शाळा जपल्या पाहिजेत. आपण माणसे जोडली पाहिजेत. पाटील यांचा इतिहास पाठ्या पुस्तकात आला पाहिजे. तरच पुढील पिढीला त्यांनी केलेले कार्य समजेल, असे स्पष्ट प्रतिपादन ॲड. रोशन पाटील यांनी येथे केले.
कर्जतच्या महापुरुष जयंती समितीच्यावतीने मुद्रेश्वर मंदिराच्या सभागृहात लोकनेते नारायण नागू पाटील यांच्या 134 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विजय कोंडीलकर यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले होते. यावेळी इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कर्जतचे अध्यक्ष विलास सांगळे व ॲड. विवेक भोपी आदींसह माजी नगरसेवक कृष्णा घाडगे, दीपक भालेराव, संतोष ऐनकर, रामचंद्र खरमरे, जगदीश ऐनकर, विकी कदम, मोहन गवंडी, सुभाष मेहतर, सुधीर सोनावले, कृष्ण ठाकूर, संतोष कोळंबे, इरेश्वर गायकवाड, स्वीटी बार्शी व हेमंत कोंडीलकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, भगवान धुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजाराम गायकवाड यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याची माहिती सांगितली. वसंत कोलंबे यांनी कर्जत तालुक्यातील हुताम्यांचे कार्य सांगून नारायण नागू पाटील यांच्या कुळ कायद्याच्या लढ्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. विजय कोंडीलकर यांनी अध्यक्षीय भाषणात नारायण नांगू पाटील यांच्या जीवनातील वेग वेगळे प्रसंग सांगितले. तसेच, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हावरे यांनी केले.







