नारायण भोईर यांचे निधन

। वाकण । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे नागोठणे विभागातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे कट्टर समर्थक व रायगड जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्याध्यापक तसेच नागोठणे येथील दत्तकृपा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक नारायण भोईर गुरूजी (वय 67) यांचे रविवारी (दि. 25) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे मूळ गाव असलेल्या शिहू-जांभूळटेप व नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, नातेवाईक यांच्यासह मोठा परिवार आहे. भोईर गुरुजी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या शिक्षकी पेशात अनेक विद्यार्थ्यांना घडविले. आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. भोईर गुरुजी हे तरुणपणा पासून शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते. नोकरी करीत असताना देखील त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. पक्ष संघटना वाढीसाठी ते नेहमीच कार्यरत राहत असत.

Exit mobile version