केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू इथं ‘अधीश’ नावाचा बंगला आहे. राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. त्यानंतर राणेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळून लावली. त्यानंतर राणेंनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानेही नारायण राणेंची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नारायण राणेंना मोठा दणका बसला आहे. तीन महिन्यांत अवैध बांधकाम पाडा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळताना संबधित बंगल्यातील तीन महिन्यात अवैध बांधकाम पाडा असे आदेश राणेंना दिले आहेत. मुकुल रोहतगी यांनी नारायण राणे यांच्या वतीने बाजू मांडत एस.एफ.आय वाढवून देण्याची मागणी केली मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. तसेच न्याय सर्वांसाठी समान आहे. घराचा एस.एफ.आय वाढवून घेण्यास तुम्हाला जर परवानगी दिली तर, मुंबईतून अशा कितीतरी याचिका येतील. त्यामुळे अशा प्रकारे परवानगी दिल्यास मुंबईत किती अनधिकृत बांधकाम अधिकृत होतील असा प्रतिप्रश्न न्यायायलाने उपस्थित केला.

Exit mobile version