मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही

नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा अज्ञानी
सिंधुदुर्ग | वार्ताहर |
मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, त्यामुळे अजित पवार यांनी गप्प बसावे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजून अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:चे खाते सांभाळावे अशी टीका राणे यांनी केली.
कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा रविवारी शेवटचा दिवस होता.त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. यावेळी नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या टिकेचा समाचार घेतला. अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ‘आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे,’ असेही ते म्हणाले.

राज्यातील सरकारमध्ये जे काही अनेक नेते आहेत, ते ईडी,सीबीआयच्या रडारावरच आहेत त्यामुळे कारवाई तर होणारच. म्हणजे काय आम्ही कारवाई करत नाही तुम्ही थांबवा, हे काही होणार नाही.
नारायण राणे,केंद्रीय मंत्री

Exit mobile version