पत्थर का जवाब पत्थर से देंगे भाजपाचा इशारा
महाड | विशेष प्रतिनिधी |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर महाड मध्ये शिवसैनिक संतप्त झाले आहेत. काही संतप्त शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर दगडफेक करीत आपल्या संतापाला वाट करून दिली. तर भाजपने देखील पत्थर का जवाब पत्थर से देंगे मात्र आम्ही संयमी आहोत अशा शब्दात इशारा दिला आहे.
15 हजार रुपयांच्या जामीनावर नारायण राणे यांची सुटका झाली आहे. मात्र पुढील 2 सोमवार त्यांना हजेरी लावायला सांगण्यात आले आहे. पोलिसांना राणे यांच्या आवाजाचे नमुने सादर करावे लागणार आहेत. तर राणे यांना रायगडात दोन दिवस गुन्हे शाखेत हजेरी लावण्यास सांगीतले आहे. 30 ऑगस्ट आणी 13 सप्टेंबर असे दोन सोमवार सांगीतले आहे.
यापुढे भविष्यात अशी घटना घडणार याची लेखी हमी न्यायालयाने नारायण राणे यांच्या कडून घेतली आहे. त्याचप्रमाणे पुराव्यासोबत छेडछाड करायची नाही असे देखील कोर्टाने बजावले आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील कोर्टात दाखल झाले होते.
यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, नारायण राणे उद्याच्या दिवस आराम करतील तर परवा पुन्हा यात्रा निघेल. नारायण राणे मुंबई थांबतील नारायण राणे यानी कोर्टाचे आभार मानले.