नरेंद्र घरत याचे निधन

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील नरेंद्र लक्ष्मण घरत यांचे वृध्दापकाळाने बुधवार ( दि.17) रोजी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते.

घरत हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यानी ग्रामसेवक पदावर 33 वर्ष काम केले, तसेच कोएसो माध्यमिक शाळा परहूर पाडा शाळेचे सभापती म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. समाजकारणासह राजकारणात ते सक्रीय होते. त्यांच्या पार्थिवावर परहूरपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी, ग्रामस्थ, व नातेवाईक उपस्थित होते. यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार (26) तर उत्तरकार्य रविवार ( दि.28 ) मे रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती घरत कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version