| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. सकाळी कोणतीही सूचना न देता पंतप्रधान मोदी याठिकाणी आले. यानंतर मोदींनी वायूदलाच्या जवानांशी संवाद साधताना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा
आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकिस्तानी केला होता. आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगवाही पाकने केला होता. त्याच धावपट्टीवर पंतप्रधान मोदींनी विमान उतरवून धावपट्टी सुरक्षित आहे हे दाखवलं. आदमपूरमधील एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा ठरवला. त्यात एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत मोदींनी जवानांसोबत संवाद साधला. तर पाकिस्तान आदमपूर एअरवेज उद्ध्वस्त केल्याचे मॉर्फ केलेले फोटो दाखवले होते.
11 पाकिस्तानी सैनिक ठार
पाकिस्तानी सैन्याने 7 ते 10 मे या कालावधीत भारतावर ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला होता. भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे अनेक महत्त्वाचे हवाई उद्ध्वस्त झाले होते. यावेळी 11 पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची कबुली पाकच्या सैन्याने दिली आहे. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये स्क्वार्डन लीडरचाही समावेश आहे. अब्दुल रहमान, दिलावर खान, इकरामुल्ला, खालिद, मुहम्मद अदील अकबर, निसार आणि स्क्वार्डन लीडर उस्मान युसूफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, नजीब, कॉर्पोरेल तंत्रज्ञ फारुख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ मुबाशिर यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आली आहे.