गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना राष्ट्रीय पुरस्कार

। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यामध्ये काम केलेल्या आणि सध्या सातारा जिल्ह्यातील जावळी येथे कार्यरत असलेल्या गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेत भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था नवी दिल्ली (एनआयइपीए) यांच्यातर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था नवी दिल्ली यांच्यातर्फे शिक्षण क्षेत्रांत अधिकार्‍यांनी केलेल्या अभिनव उपक्रमासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असता महाराष्ट्रातील सहा अधिकार्‍यांना हा पुरस्कार जाहीर करण्यता आला असून, यामध्ये जावळीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. अरुणा यादव यांनी महाड येथे गट शिक्षणाधिकारी पदावर काम करीत असताना राबविण्यात आलेल्या उपक्रमांची दखल राष्ट्रीय शैक्षणिक एवं प्रशासन संस्थेने घेतली आणि त्यांची पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.

Exit mobile version