महाराष्ट्राच्या संघात रायगडचे सहा खेळाडू
| अलिबाग | वार्ताहर |
राष्ट्रीय बेंचप्रेस (क्लासिक व इक्विप) स्पर्धा दि. 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत बंगळुरू कर्नाटक येथे होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभागी होणार आहे. या संघात रायगड जिल्ह्यातील सहा खेळाडूंची निवड विविध गटांसाठी झाली आहे.
या स्पर्धेत इक्विप गटात रायगड जिल्ह्यातील संतोष गावडे (अलिबाग, सार्व.व्या. शाळा वाडगाव, 59 किलो), ऋतिक पोळ (खोपोली, आयर्न मॅट जिम. ज्युनि.) या खेळाडूंचा समावेश आहे. तर, क्लासिक स्पर्धेसाठी जय पाटील (संसारे फिटनेस पेण, सब ज्युनि. 83 किलो गट), तन्मय पाटील (संसारे फिटनेस, पेण जुनि. 93 किलो गट), ऋतिक पोळ (आयर्न मेट जिम, खोपोली, जुनि. 120 +गट) हे खेळाडून सहभागी होणार आहेत. तसेच ओपन गटासाठी अक्षय शांनमुगंम, आयर्नमेंट जिम खोपोली, 74 किलो गट, क्लासिक स्पर्धा, मास्टर क्लासिक स्पर्धा दिनेश पवार (लोखंडे जिम खोपोली, 74 किलो) या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये अक्षय शांनमुगंम आणि दिनेश पवार हे आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत.
या सर्व स्पर्धकांना पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोशियन रायगडच्यावतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, उपाध्यक्ष सुभाष भाटे, सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, माधव पंडित, मानस कुंटे, दत्तात्रय मोरे आणि सचिव अरुण पाटकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत रायगडचे खेळाडू पदक प्राप्त होतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.