अलिबागमध्ये राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा उत्साहात

| अलिबाग | प्रतिनिधी |

अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालय आणि अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि.16) करण्यात आले होते. याला महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा आणि सत्र मुख्य न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्या हस्ते व जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच अधिवक्ता परिषद रायगडचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष पवार आणि अधिवक्ता परिषद अलिबागचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.

विद्यार्थ्यांनी विधी शाखेचे शिक्षण घेत असताना जास्तीत जास्त मुटिंग, ड्राफ्टिंग आणि मौखिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी अजेय राजंदेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. अ‍ॅड. गौतम पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वास, प्रसंगावधान इत्यादी कौशल्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष पवार यांनी यावेळी अभिरूप न्यायालयाचे महत्त्व विशद केले. उद्घाटन समारंभाचे आभार व्यक्त करताना विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य अ‍ॅड. नीलम हजारे यांनी विविध स्तरांवरील न्यायालयांमधील न्यायालयीन प्रक्रिया अवगत होण्यासाठी अभिरूप न्यायालय स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत व्यक्त केले.

अभिरूप न्यायालय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 13 महाविद्यालयांतील 39 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या दोन समस्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण अ‍ॅड. रवींद्र ओक, अ‍ॅड. राजेंद्र कुंटे, अ‍ॅड. मनोज गुंजाळ, अ‍ॅड. वैभव भोळे या चार ज्येष्ठ विधिज्ञांमार्फत करण्यात आले

Exit mobile version