कामथ शाळेत राष्ट्रीय पोषण महासप्ताह

सुतारवाडी | वार्ताहर |
रा.जि.प. शाळा कामथ येथे राष्ट्रीय पोषण महासप्ताह उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये वृक्षारोपण, स्वयंपाकी/पालक पाककृती स्पर्धा, रानभाज्यांचे प्रदर्शन घेऊन त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे, खाऊचे एकमेकात शेअर करणे इ. उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख खेमसिंग चव्हाण, शा.व्य. समिती अध्यक्ष सेजल सुतार, शाळेच्या मुख्याध्यापक रेश्मा वाघचौरे, शिक्षिका अंजली गुंजोटे, तसेच माजी सरपंच मेघा निळेकर, अंगणवाडी सेविका जयश्री सानप, आशा कार्यकर्ती विद्या निळेकर, रामचंद्र सानप, मदतनीस अलका महाडिक व सुमती निळेकर, सविता निळेकर, पालकवर्ग-मंगल जाधव, जयश्री जाधव, शेवंती मोरे, रेणुका वाघमारे, उषा पवार, ललिता पवार, वनिता पवार, मंगला जाधव, ममता जाधव, दिपाली पवार, गीता पवार, हौशी वाघमारे, सुरेखा जाधव, सीता पवार, गंगू वाघमारे सर्व ग्रामस्थ तसेच बालचमू उपस्थित होते.
प्रदर्शनात मोड आलेली कडधान्ये, धान्ये, मसाले, पापड, फळे, फळभाज्या, पालेभाज्या, सुकामेवा, तसेच चविष्ट अन्नपदार्थ यामध्ये, ज्वारीची भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, दही, इडली चटणी, अप्पे चटणी, घावणे, ढोकळा ,उपमा, ताक, गुलाबजाम, कढी, मोदक, अळूच्या वड्या, मिठाई, मासांहारी कालवण, वडे, शाबूची खीर, लोणचे अशा अनेक पदार्थांचा मुलांनी आस्वाद घेतला.

Exit mobile version