टीएमसी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर

| माणगाव | वार्ताहर |

जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर नुकतेच उणेगाव येथे संपन्न झाले. यावेळी शिबिरामधील विद्यार्थिनींनी जन्म बाईचा बाईचा या गीतावर आधारित नृत्य सादर केले. या नृत्याला विद्यार्थी स्वयंसेवक रोहन वाढवळ याने ढोलकीची उत्तम साथ दिली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. चंद्रकांत माळी यांनी शिबीर कालावधीत झालेल्या कामकाजाचा अहवाल सादर केला. व्यायाम, प्राणायाम, प्रार्थना, श्रमदान, वक्त्यांची व्याख्याने संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम गावामधून पथनाट्य, भारुड ,पोवाडे, रॅली इत्यादी माध्यमातून एड्स, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता व मतदार जनजागृती या विषयांवर आधारित सामाजिक जनजागृती विद्यार्थी स्वयंसेवकांनी याविषयी माहिती दिली.
श्रमदानातून उणेगाव येथील होळीची जागा, मराठी शाळा परिसर, बौद्धवाडी, ग्रामपंचायत परिसर स्वच्छता, शोषखड्डा आणि गावांमधील विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली. शिबीर यशस्वीपणे होण्याकरिता उणेगाव सरपंच शुभांगी शिर्के, राजेंद्र शिर्के, रूपाली देवरे, विजय सत्वे, भगवान शिंदे, सुरेश सत्वे, वासुदेव सत्वे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, राजीप मराठी शाळा उणेगाव येथील मुख्याध्यापक गावडे आणि त्यांचे सहकारी, महाविद्यालयाचे अमित बाकडे, भारत पवार, दिनेश कुळे आणि सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंदांचे उत्तम सहकार्य लाभले.

शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माणगाव येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. श्रीकांत वैद्य, जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी नानासाहेब सावंत, संदीप सावंत, रामदास पुराणिक, विजय मेहता साहेब, प्र. प्राचार्य प्रा .हर्षल जोशी, प्रा. अशोक मोरे, अमित बाकाडे, प्रा. भारत पवार, दिलीप ढेपे महाविद्यालयातील सेवक वर्ग, त्याचप्रमाणे उणेगाव येथील शाळा समितीचे अध्यक्ष वासुदेव सत्वे, सुरेश सत्वे, ग्रामपंचायत सदस्य सुचिता सुरेश सत्वे, स्मरणिका संजय जुमारे तसेच ग्रामस्थ आणि महाविद्यालयातील स्टाफ यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. चंद्रकांत माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य हर्षल जोशी यांनी केले.

Exit mobile version