राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद

स्पर्धेत पृथा वर्टीकर विजेती

| पुणे | वार्ताहर |

कोलकत्ता येथे नुकत्याच झालेल्या 85 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पुण्याच्या पृथा वर्टीकरने पटकाविले. कोलकता येथे संपलेल्या या स्पर्धेत पृथा वर्टीकरच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले होते. या यशात सतरा वर्षीय पृथा वर्टीकरचा मोलाचा वाटा होता. त्यापाठोपाठ पृथाने एकेरीतही जोरदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठली होती. पृथाने चौथ्यांदा राष्ट्रीय स्तरावर जेतेपद पटकावले. गेल्या वर्षी पृथा विजयवाडा आणि पंचकुलाला झालेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धांतील 19 वर्षांखालील मुलींत सुवर्णपदके पटकावली होती. त्याआधी, तिने भोपाळला झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींत जेतेपद पटकावले होते.

Exit mobile version