| म्हसळा । वार्ताहर ।
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची सोमवार (दि.31) जयंती असून, हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस लोकप्रिय चळवळ व्हावी, या उद्देशाने म्हसळा तालुक्यांत विविध उपक्रम राबविणार आहे. एकता दौड शहरांतील जान्हवी (करडे) पेट्रोल पंप येथून एकता रॅलीचे आयोजन करण्यांत आले आहे. यामध्ये राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ आणि एकता दौड असा मुख्य कार्यक्रम आसल्याचे निवासी नायब तहसीलदार जे.एम.तेलंगे यानी सांगितले. यावेळी म्हसळा शहर नगरपंचायतीचे पदाधिकारी,नगरसेवक कर्मचारी, तालुक्यातील महसूल, वनविभागाचे कर्मचारी, जि.प. आणि पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, कर्मचारी, तालुक्यांतील विद्यमान आणि माजी सरपंच, पोलीस पाटील, पोलीस मित्र, दक्षता समिती सदस्य ,शांतता समिती सदस्य,वसंतराव नाईक कॉलेज, न्यू इंग्लीश स्कूल,अंजुमन ईस्लाम हायस्कूल, आयडीयल इंग्लीश स्कूल सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग रहाणार आहे. तरी राष्ट्रीय एकता दिनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.