। कर्जत । प्रतिनधी ।
कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणार्या तमनाथ सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले असून, चेअरमनपदी परशुराम घारे व उपचेअरमनपदी उत्तम भोईर यांची निवड करण्यात आली आहे.
तमनाथ सोसायटीची निवडणूक काही दिवसांपूर्वी बिनविरोध झाली होती, परंतु सोसायटीच्या चेअरमन व उप चेअरमनपदाची निवडणूक बाकी होती, सदरील निवडणूक प्रक्रिया पार पडली, या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप आघाडीकडून परशुराम कुशाबा घारे व उत्तम बाळू भोईर यांचे नामांकन भरण्यात आले, त्यांच्या विरोधात शिवसेना व बीजेपी युतीकडून सतिश आत्माराम बोराडे व जगन्नाथ दामोदर पाटील यांचे नामांकन भरण्यात आले होते. सदरील निवडणूक प्रकिया पार पडल्यानंतर आघाडीचे परशुराम घारे व उत्तम भोईर यांची मोठ्या फरकाने निवड झाली व पुन्हा एकदा तमनाथ सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले.
भालीवडी मध्ये राष्ट्रवादी-शेकापचे पदाधिकारी
कर्जत तालुक्यातील भालीवडी विवीध विकास कार्यकारी सेवा संस्थेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे गोपाळ आगज हे अध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले तर उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मजीद नार्वेकर हे बिनविरोध निवडले गेले.या ठिकाणी देखील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली असून सेनेचा केवळ एक संचालक उपस्थित राहिला.