। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
गोखले शिक्षण संस्थेच्या श्रीवर्धन येथील महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागा तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तो यशस्वीपणे पार पडण्यासाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. . प्रा..श्रीनिवास जोशी,प्रा.गोरुले,प्रा.गमे आणि प्रा. पाठराबे यांनी आपल्या मनोगतांतून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मारिया खान, मृणाली साळगावकर आणि विशाखा विचारे,प्रविण चोगले यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रा.जावळेकर व प्रा.लंकेश्वर यांनी
विविध खेळांचे परीक्षण केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.कल्याणी नाझरे,प्रा.निलेश चव्हाण, प्रा.वाल्मिक जोंधळे,प्रा.किशोर लहारे,प्रा.शंकर भोईर,प्रा.मृण्मयीभुसाणे,प्रा.योगेश लोखंडे,श्री.सागर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलवा दळवी व श्रेयस मोरे या विद्यार्थ्यांनी केले तर आभारप्रदर्शन ऋतबा नाझिरी या विद्यार्थिनीने केले.