नवी मुंबई विमानतळाच्या कार्गो सेवेला आंतरराष्ट्रीय झेप!

हाँगकाँगहून 62 टन माल घेऊन कॅथे कार्गोचे विमान प्रथमच दाखल

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहतूक नेटवर्कमध्ये आणखी एका आंतरराष्ट्रीय जोडणीची भर पडली आहे. हाँगकाँग येथून तब्बल 62 टन माल घेऊन ‘कॅथे कार्गो’चे विमान प्रथमच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दृष्टीने ही हालचाल महत्त्वपूर्ण मानली जात असून, नवी मुंबई विमानतळाची कार्गो हाताळणी क्षमता आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवा विस्तारत असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. हाँगकाँगसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रातून थेट मालवाहू विमानाचे आगमन झाल्याने नवी मुंबई विमानतळाच्या जागतिक कार्गो नेटवर्कमध्ये आणखी एक महत्त्वाची कडी जोडली गेली आहे. विविध देशांमधील व्यापार आणि मालवाहतुकीसाठी नवी मुंबई विमानतळाचे महत्त्व यामुळे वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतूक कामकाज यशस्वीपणे हाताळण्याच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाढत्या क्षमतेचे दर्शन या कार्गो विमानाच्या आगमनातून झाले आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतुकीच्या विस्तारासाठी ही घडामोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Exit mobile version