Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील वाशी हायवे ब्रिजवर पुण्याहून गुजरातमधील राजकोटकडे जाणाऱ्या मनीष ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढा घातला. घटनेची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे वाशी हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बसला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किट किंवा इंजिन अधिक गरम झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version