प्रीतम म्हात्रे यांना ‘नवी मुंबई रत्न’

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याबद्दल पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई आणि क्रेडाई एमसीएचआय युथ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई रत्न पुरस्कार देऊन गौरविले.

क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्या वतीने कोव्हिड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल नवी मुंबई रत्न पुरस्कार 2022 चे वितरण वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्या वतीने कोव्हिड काळात महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Exit mobile version