नवी मुंबई वॉरिअर्स संघ विजयी

बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।
बँक ऑफ महाराष्ट्राने नुकताच आपला 87 वा व्यवसाय प्रारंभ दिन मोठ्या थाटात साजरा केला. या अनुषंगाने बँकेने आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी व समाजामध्ये एक सकारात्मक संदेश पोहचविण्यासाठी नवी मुंबई झोनने पनवेल येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली.

या स्पर्धेत नवी मुंबई झोनच्या वतीने अनुक्रमे नवी मुंबई वॉरिअर्स, वाशी चार्जेर्स, रायगड सुपरकिंग्स, कोकण डेअरडेव्हिल्स अशा चार चमूने सहभाग घेतला होता. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बँकेचे कार्यकारी संचालक विजयकुमार यांनी केले. अंतिम सामना वाशी चार्जेर्स आणि नवी मुंबई वॉरिअर्स यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. वाशी चार्जेर्स चमूने 8 शतकात 102 धावांचे मोठे बलाढ्य असे लक्ष्य नवी मुंबई वॉरिअर्सला दिले. नवी मुंबई वॉरिअर्स चमूने सुरुवातीचे आपले दोन फलंदाज लवकर गमावल्या नंतरही चमू दबावात आली. परंतु नवी मुंबई वॉरिअर्स चमूचे कर्णधार अभिनव शर्मा यांनी तुफान फलंदाजी करून एकवेळ अशक्य वाटणारे 102 धावांचे लक्ष्य 7 षटकातच पूर्ण केले.

या स्पर्धेत विविध पुरस्कार देऊन सुद्धा खेळाडूंना गौरविण्यात आले. सामनावीर उप झोनल मॅनेजर, अमित सुतकर, शृंखलेचा सर्वोत्तम खेळाडू अभिनव शर्मा, उत्कृष्ट गोलंदाज दर्शन शिंदे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रशांत मोरे, उत्कृष्ट फलंदाज पूजन झा यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी बँकेच्या महाप्रबंधक व झोनल मॅनेजर, अपर्णा जोगळेकर यांनी सर्व सामान्यांना उपस्थित राहून खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविले. सामन्याचे पारितोषिकाचे वितरण झोनल मॅनेजर, अपर्णा जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उप अंचल प्रबंधक, अमित सुतकर, सहाय्यक महाप्रबंधक पिंकी राणी, मुख्य प्रबंधक दिलीपकुमार उपाध्याय, मनीषा शर्मा, चंदन कुमार, रवी बालचंदानी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले.

Exit mobile version