महामार्गावरील 628 बंद दिव्यांचीही दुरुस्ती
| पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक मिळाला असून दुरीकडे मुंबई व महाराष्ट्राला जोडणार्या सायन पनवेल मार्गावरील पालिका हद्दीतील दिवाबत्तीची लुकलुक सातत्याने अपघाताला आमंत्रण देत होती. अपुर्या विजव्यवस्थेमुळे व महामार्गावरील अनेक बंद दिव्यांमुळे पालिकेला सातत्याने नवी मुंबई शहरातून जाणार्या मार्गावरील पथदिवे बंद असे आरोप होत असल्याने पालिकेची बदनामी होत असे. पालिकेने याच महामार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठीचे काम करण्यात येत असून महिनाभरात या मार्गावरील काम पूर्ण केले जाणार असून नव्या वर्षात पालिका हद्दीतील महामार्गावर एलईडी पथदिव्याचा प्रकाश पडणार असल्याची माहिती पालिका विद्युत विभागाने दिली आहे.
पालिका महामार्गावरील पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसह नवीन एलईडी दिवे लावण्याचे 10.54 कोटींचे काम केले जात असून याच्या कामाला वेगात सुरवात करण्यात आली आहे. नवी मुंबई हद्दीतून जाणार्या महामार्गावरील वाशी टोल नाका ते सी.बी.डी. बेलापूर हा भाग नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत येत असून सदर मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने व त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने त्याच्या दूरवस्थेविषयी ,सततच्या दिवाबत्तीविषयी प्रवाशी, नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस दोष दिला जात होता. याचा परिणाम नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेवर सातत्याने होत असे. या महामार्गावरील 9 डिसेंबर 2021 ला पालिकेकडे दिवाबत्ती हस्तातंरीत करण्यात आल्यानंतर पालिकेकडून हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या कामासाठी 10.54 कोटी खर्चातून महामार्गावरील एलईडी दिवाबत्ती लावली जात आहे. संबंधित ठेकेदाराने वेगात कामाला सुरवात केली असून असून पालिकेने या मार्गावरील सुरवातीला महमार्गावरील अंधार दूर करण्यासाठी 628 बंद दिव्यांची दुरुस्ती केली आहे.