। आगरदांडा । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रौत्सवाचे वैध लागले असून येत्या 3 ऑक्टोबर रोजी देवीची घटस्थापना करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वच ठिकाणी गणेश कला मंदिरात ही देवी बनवण्याचं काम जोरदार सुरू आहे.हुबेहूब देवी बनवण्याचं काम म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या आशिष खोतच्या सुबक आणि सुप्रसिद्ध देवीची मूर्ती सुंदर अशी नयनांची युग्मता ,पाणीदार आणि जिवंत डोळे तसेच विविध प्रकारच्या रंगसंगतीने या मूर्तीकडे भक्त आपोआपच आकर्षिले जातात.
मुरूड बाजारपेठेतील चंद्रकांत खोत यांनी 70 वर्षांपूर्वी गणेश कला मंदिराची स्थापना केली होती यामध्ये शाडुच्या मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती व देवीच्या मूर्ती घडविण्याचं काम करित तिच परंपरा त्याचा मुलगा आशिष खोत यांनी सुरू ठेवली आहे. त्याच्या बरोबर अथर्व खोत काम उत्तमपणे मूर्ती घडविण्याचं काम करित आहेत.खोत गणेश कला मंदिराला साथ देण्यासाठी बाळकृष्ण पाटील, अजय जंजिरकर, सनी पुलेकर, अनूज मसाला, बाळकृष्ण मसाल करतात. यांच्या देवीच्या मूर्तीना शहरांसह पंचक्रोशी भागात मागणी जास्त असते. मुरुड पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक 56 व खासगी 8 अशा देवीची घरगुती प्रमाणे स्थापना करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. नवरात्रौत्सवामध्ये लागणार्या वस्तुंची बाजारपेठ सजू लागली आहे.