क्रिकेट स्पर्धेत नवयुग पाबळ संघ विजयी

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे जवळील पळस येथे जय भवानी क्रिकेट क्लब व शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळ यांच्या वतीने रविवारी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी विजेत्या संघास पारितोषिक वितरणाप्रसंगी उपस्थित क्रिकेट प्रेमींना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शिवराम शिंदे बोलत होते.

कै. किशोर भालेकर यांच्या स्मरणार्थ जय भवानी क्रिकेट क्लब व शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळ यांनी आयोजिलेल्या कै. किशोर भालेकर स्मृती चषक व सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक नवयुग पाबळ, द्वितीय क्रमांक कोंडगाव, तृतीय क्रमांक शिवशंभु वरप, चतुर्थ क्रमांक श्री पळसाई, पळस आदी संघानी पटकाविला. या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच म्हणून रोशन गायकवाड पाबळ संघ व मॅन ऑफ द सिरीज म्हणून सौरभ धामणे कोंडगव संघ यांना गौरविण्यात आले. विजेत्या संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरणाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते शिवराम शिंदे, पळस सरपंच चंद्रकांत भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पळस विभाग अध्यक्ष विक्रांत घासे, पळस सरपंच चंद्रकांत भालेकर, माजी सरपंच हिराजी शिंदे, संतोष शिर्के, योगेश विचारे, संतोष भालेकर, पोलीस पाटील बबन शिंदे, बबन भालेकर, प्रकाश कदम, दिनेश इंद्रे, राजेश शेलार, परशुराम शिर्के, विजय विचारे, मनोज शिंदे आदींसह क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version