नवाब मलिक यांची हायकोर्टात धाव

| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली असून, त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईविरोधात मलिक यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याला त्यांनी हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. तो रद्द करण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाकडे केली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात मलिक यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याची विनंती त्यांनी कोर्टाकडे केली आहे. ईडीने केलेली अटकेची कारवाई बेकायदा असून, तात्काळ सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.

याच प्रकरणात आता नवाब मलिकांचा मुलगा फराझ यालाही समन्स बजावण्यात आलं आहे. दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ङ्गईडीफने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याला ईडीने समन्स बजावलं आहे.

Exit mobile version