केंद्र सरकारने लादलेल्या दरवाढीविरोधात रा.काँ. आक्रमक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अलिबाग यांच्या वतीने केंद्र सरकारने लादलेल्या दरवाढीविरोधात पिपळभाट येथे निषेध व्यक्त केला. पेट्रोल, डिझेलनंतर आता गॅस सिलिंडरच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूर पुरता भरडला गेला आहे. महिन्याचे आर्थिक बजेट सांभाळताना गृहिणींना दमछाक करावी लागत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा देत दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.

यावेळी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दत्ता ढवळे यांच्या नेतृत्वखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात वाडगाव सरपंच सरिता जयेंद्र भगत, प्रिया ढवळे आदींनी थेट रस्त्यावर चूल पेटवून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.

Exit mobile version