राष्ट्रवादी काँग्रेसचा माणगाव येथे मेळावा

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी (दि.31) दुपारी 2.30 वाजता गांधी मेमोरियल हॉल, निजामपूर रोड दत्तनगर माणगाव येथे कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. खा.सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उमा मुंढे, अंकित साखरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version