। मुंबई। वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज (दि.15) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षाच्या निकाल वाचनाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता आणखी पुढे काय-काय होणार याकडे सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल थोड्याच वेळात
