| नागोठणे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले असून, पावसाअभावी भाताची पिके पिवळी पडली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपली असून, खाडीपट्ट्यात कंपन्यांनी सोडलेल्या केमिकलमुळे शेती नापीक झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त म्हणून वगळलेले रायगडसह कोकणातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावेत, अशी ठोस भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नागोठणे येथे प्रसारमाध्यमांसमोर मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आग्रही मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष सज्जाद डावरे, जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, रुपेश खांडवे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर, रोहा तालुका अध्यक्ष तुषार खरीवले, रोहा तालुका युवक अध्यक्ष मुजाहिद मुजावर, रत्नाकर मोकल, सहैफ शेख, मेधा खरीवले, दिनेश काटकर, राजू रोडेकर, आरिफ दुकानदार, अबू गोरमे, अजय डावरे आदींसह नागोठणे, रोहा, सुधागड, माणगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
‘राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या सोबत’
