कळंबमध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीचा धक्का

। कर्जत । वार्ताहर ।
तालुक्यातील कळंबमध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीकडून धक्का मिळाला असून, सेनेतील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कर्जतमधील शिवसेनेच्या स्थापनेपासून कळंब ग्रामपंचायतमध्ये ज्यांनी खर्‍या अर्थाने शिवसेना शाखेची स्थापना केली असे प्रमोद मिरकुटे यांचे पुतणे उमेश प्रवीण मिरकुटे, तसेच त्यांचे सहकारी अन्वर बुबेरे यांचे चिरंजीव रईस बुबेरे, सचिन चोनकर, शिवसेनेचे पंधरा वर्षे शाखाप्रमुख असलेले जनार्दन बदे, सागर बदे, ज्ञानेश्‍वर बदे, रोजप लोगडे, अविनाश भोईर, नवीन परदेशी, प्रभू धुळे, मोहन पारधी, रवींद्र बनसोडे, प्रभाकर बनसोडे, आदी कट्टर शिवसैनिकांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सेनेच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून हा प्रवेश करण्यात आल्या असल्याचे वृत्त आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष भगवान चंचे, महिला तालुकाध्यक्षा अ‍ॅड.रंजना धुळे, गटनेते शरद लाड, माजी सरपंच फाईक खान, विद्यमान उपसरपंच राहुल परदेशी, शाहनावाज पानसरे, अरुण बदे, जितू काळण, शोहेब पानसरे, शाहिद मस्ते, महेश कोंडीलकर, वसंत बदे, साहिर लोगडे, विठ्ठल बदे, सागर बदे, विनोद मोरे, कैलास बनसोडे, सुमित बनसोडे, महिंद्र बनसोडे, हर्षद मस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version