वाढत्या नागरीकरणयामुळे ममदापूरसाठी वाढीव नळपाणी योजनेची गरज – पंडित पाटील

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरणच्या नागरी वस्तीला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीप्रमाणे ममदापूर ग्रामपंचायतीसाठी वाढीव नळपाणी योजना राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. 2011 मध्ये मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे लोकार्पण रविवारी पंडित पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.


2011मध्ये रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून काम करीत असताना ममदापुर गावासाठी दोन कोटी 35लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे काम करणारा ठेकेदार कंपनीने काम सोडून गेल्याने नळपाणी योजनेचे काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता जलकुंभ, जलशुध्दीकरण केंद्रासह घरोघरी नळाचे पाणी पोहचविण्यासाठी बनविण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे लोकार्पण आज 15 मे रोजी करण्यात आले. त्यावेळी पंडित पाटील यांचे हस्ते कोनशिला अनावरण करून या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. उल्हास नदीमधून पाणी उचलून ममदापूर ग्रामपंचायत मध्ये पाणी आणून ते पाणी जलशुद्धीकण केंद्रामध्ये शुद्ध करून घरोघरी पाणी देण्याची योजना आहे. साडे तीन लाख लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेले दोन जलकुंभ बनविण्यात आले आहेत. या योजनेला मंजुरी देणारे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष पंडित पाटील यांच्या हस्ते नळपाणी योजनेचे उद्घाटन करण्यात आले.


त्यावेळी बोलताना पंडित पाटील यांनी आपण योजना 2011 मध्ये बनविली तेव्हा या भागात इमारती नव्हत्या, मात्र आता या इमारती पाहून आनंद वाटतो. जेथे नळाचे मुबलक पाणी असते तेथे नागरी वस्ती वाढते. मात्र ममदापूर गावासाठी केलेल्या नळपाणी योजनेचे पाणी नागरी वस्तीला देण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायतचे असते. त्यामुळे नवीन वसाहतीला पाणी दिल्यास गावात पुरेसे पाणी ग्रामस्थांना मिळणार नाही. परंतु नळपाणी योजना चालवायची असेल तर पाणीपट्टी वसूल होणे महत्वाचे असल्याने नवीन नागरी वस्तीला पाणी द्यावे लागणार आहे. ही बाब आजा माझ्या लक्षात आली असून आपण या वस्तीसाठी नवीन वाढीव पाणीयोजना तयार करणे काळाची गरज आहे. मात्र आपण आता नवीन वाढीव पाणी योजनेसाठी तयारी सुरू केली असून स्वच्छ भारत मिशन मधून नवीन नळपाणी योजना बनवायची आहे असे निवेदन पंडित पाटील यांनी केले. जुनी योजना 2011 साली मंजूर झालेली असल्याने आणि पूर्वीची योजना बनविताना असलेली लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या लक्षात घेवून शासनाकडे वाढीव नळपाणी योजनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे पंडित पाटील यांनी जाहीर केले.

यावेळी शेकापचे नेते विलास थोरवे, शेकापचे रायगड जिल्हा खजिनदार श्रीराम राणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, ममदापुर ग्रामपंचायतचे सरपंच दामा निरगुडे, उपसरपंच अनिकेत गायकवाड, कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, रायगड जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र हजारे, नेरळ विवीध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पेमारे, शेकाप तालुका युवा आघाडी अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष अनिल जोशी, शेकाप विभागीय चिटणीस पांडुरंग बदे, ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू कालेकर, रवींद भोईर, नेरळ शहर चिटणीस मनोहर हजारे, ममदापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सखाराम शिंगे, पुंडलिक शिनारे, शाकीब पालटे, जुयेद पालटे, स्वाती निरगुडे, माजी उपसपंच कृष्णा शिंगे, ग्रामपंचायत सदस्य भिका निरगुडे, नंदिनी शिनारे, कविता शिंगे, कल्पना डांगरे, नाहिदा पोंजेकर आणि जुबेर पालटे आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांच्यासह ग्रामस्थ रामदास शिनारे, फरवेज पालटे, श्रीकांत कराले, रोहित कराळे, मिलिंद शिंगे, रोशन शिंगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी आणि नवीन वसाहती मधील रहिवाशी यांची पाण्यासाठी होत असलेली गैरसोय काही प्रमाणात दूर झाली आहे,पण पुढील वर्षभरात ममदापूर वाढीव पाणी योजना मंजूर झालेली असेल.

पंडित पाटील, माजी आमदार
Exit mobile version