शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग शोधण्याची गरज

डॉ. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन
। पेण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोना काळात आदिवासी मुलांच्या शिक्षणात अंतर पडले. या काळात शाळाबाह्य झालेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग शोधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. त्या अंकुर ट्रस्ट व आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आदिम जमाती संरक्षण कार्यक्रमाच्या सांगता शिबिरात बोलत होत्या. यावेळी शाळाबाह्य विद्यार्थी अभ्यास केंद्रातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कातकरी आदिवासी जे उपजीविकेकरिता निरनिराळ्या ठिकाणी सहा महिन्यांतून अधिक काळ राज्याच्या विविध भागांत स्थलांतरित होत आहेत. यामुळे हा समाज शिक्षण प्रवाहापासून दूर जात असल्याचे दिसून येते. यामध्ये कोरोना महामारीत शाळेत पटावर नाव आहे; परंतु शाळेत रस नसल्याने अजूनही कातकरी मुलांची संख्या मोठी आहे. 1972-73 पासून राज्य शासनाने अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणार्‍या आदिवासी लोकांचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी आश्रम शाळांची योजना कार्यान्वित केली. परंतु, मार्च 2020 पासून उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे नियमित शाळा वसतिगृह बंद झाले व याचा मोठा परिणाम शिक्षणाच्या सातत्यावर राहिला.

कोरोना महामारीमुळे रोजगारासाठी स्थलांतरित झालेले विद्यार्थी शेती व इतर कामात पालकांना मदत करू लागले व ऑनलाइन शिकवणीची कोणतीही सोयी-सुविधा नसल्याने असे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून दूर फेकले गेले. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाने आदिम जमाती संरक्षण कार्यक्रम सुरु केला.

या कार्यक्रमांतर्गत 15 शिक्षण केंद्रे सुरु करण्यात आली. यामध्ये एकूण 157 विद्यार्थ्यांच्या समावेश होता. मुलांना अभ्यासात मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रावर आठ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये कल्पना पवार, गणेश वाघमारे, विवेक पवार या शिकलेल्या कातकरी प्रशिक्षकांचा समावेश घेतला. याबरोबरच श्‍वेता देसाई, गौरी दळवी, गार्गीपाटील, मीनल सांडे, प्रतिक्षा पोपकर या समाजकार्यात ग्रॅज्यूएट व पोस्ट ग्रॅज्यूएट प्राप्त केलेल्या तरुणींचा समावेश होता.

विविध वाड्यांवर शाळाबाह्य आदिवासी आदिवासी मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. खेळ, दृकश्राव्ययांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व पटवून शिक्षण घेणे का गरजेचे आहे हे सांगण्यात आले. याबबत बोलताना श्‍वेता देसाई म्हणाल्या ङ्गकातकरी आदिवासी मुलांनापाठ्यपुस्तकापेक्षा परिसरातून शिकण्यात जास्त रस असल्याचे दिसून येतेफ. त्याचप्रमाणे गौरी दळवी यांनी अभ्यासकेंद्रात पाठ्यपुस्तकाबरोबरच खेळ, नृत्य,गाणी, दृकश्राव्य व नेतृत्व गुण या माध्यमातून मुलांना शिकण्यास जास्त आवड असल्याचे सांगितले.

Exit mobile version