भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत

रोहित-यशवीरचीही दमदार कामगिरी; रुमेश थरंगा ठरला अव्वल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फक्त नीरजच नाही तर, तर भारताचे तिन्ही भालाफेकपटूने पात्रता फेरीतील आव्हान यशस्वीपणे पार केले. रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही दमदार कामगिरी करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

ग्लासगो येथे झालेल्या पात्रता फेरीत, नीरज चोप्राने भालाफेकीत 79.61 मीटरचा सर्वोत्तम प्रयत्न केला. नीरजने पहिल्या प्रयत्नात 76.28 मीटरचे अंतर गाठले. परंतु, यापेक्षाही प्रभावी कामगिरी अपेक्षित होती. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 79.61 मीटरचा थ्रो करून थेट पाचवे स्थान पटकावले. या सर्वोत्तम प्रयत्नाच्या जोरावर त्याने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर त्याने तिसरा प्रयत्न केला नाही. या स्पर्धेत हवामानामुळे खेळाडूंसमोर मोठे आव्हान उभे राहिले.

ग्लासगोमधील थंड आणि ढगाळ हवामानामुळे, कोणताही खेळाडू 84 मीटरचा ऑटोमेटिक पात्रतेचा गुण गाठू शकला नाही. त्यामुळे, दोन्ही गटांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड करण्यात आली. भारताच्या रोहित यादवने पहिला प्रयत्न 77.04 मीटर आणि दुसरा प्रयत्न 78.37 मीटरचा केला. त्याने तिसरा प्रयत्न केला नाही आणि तो नवव्या स्थानावर राहिला. यशवीरचा पहिला प्रयत्न 73.89 मीटर होता, त्यानंतर त्याचा दुसरा प्रयत्न 74.45 मीटर होता. तो पात्र ठरणार नाही असे वाटत होते. मात्र, आपल्या तिसऱ्या प्रयत्नात यशवीरने 78.36 मीटर फेक करून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. यामुळे भारताला पदकाचे तीन प्रबळ दावेदार मिळाले आहेत.

Exit mobile version