आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेत नेरळ महाविद्यालयाला सुवर्णपदक

। नेरळ । वार्ताहर ।
मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालय रग्बी स्पर्धेत नेरळ येथील मातोश्री टिपणीस वरिष्ठ महाविद्यालयाने मुलींच्या गटाचे सुवर्णपदक पटकावले. मुंबई विद्यापीठाच्या रग्बी स्पर्धा 12 ते 16 एप्रिल या कालावधीत कल्याण येथील बिर्ला कॉलेज येथे पार पडल्या. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल रग्बी फुटबॉल स्पर्धेत नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाच्या मातोश्री सुमती टिपणीस कॉलेज महाविद्यालयाच्या संघाने अंतिम विजय मिळवित सुवर्णपदक पटकावले. नेरळ येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे हे दोन्ही खेळाडू रायगड जिल्हा रग्बी असोसिएशनशी संलग्न आहेत. रब्बी खेळाडू नीता राठोड आणि हर्षदा कोळंबे यांच्या संघाने हे सुवर्णपदक मिळविले आहे. या खेळाडूंचे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक केशव पवार आणि खेळाडू यांचे रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version