नेरळ-कळंब राज्यमार्ग होणार चकाचक

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील मोठी रहदारी असलेल्या नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर तीन किलोमीटर भागात नव्याने डांबरीकरण करण्याचे काम मंजूर झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याचे डांबरीकरण काम केले जात असून अत्यंत खराब आलेल्या भागात खडीकरण आणि डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे.
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावर नेरळ-कळंब या 12 किलोमीटरच्या भागात मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक आंदोलने झाली आहेत, तसेच उपोषणे झाली आहेत आणि रस्ता रोको आंदोलन देखील झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या 12 किलोमीटर रस्त्यावरील तीन किलोमीटर अंतरावरील खराब झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी खडीकरण करून डांबरीकरण केले जात असून त्या बीबीएम डांबरीकरण नंतर कार्पेट डांबरीकरण आणि शेवटी सिलकोट डांबरीकरण अशी कामे केली जाणार आहेत. सध्या करण्यात येत असलेले बीबीएम डांबरीकरण यावर कार्पेट डांबरीकरण तब्बल महिन्याने केले जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बीबीएम केलेल्या रस्त्यावर केलेले डांबरीकरण उधळले तरी ते पुन्हा केले जाणार आहे आणि नंतरच कार्पेट डांबरीकरण केले जात असते. त्यामुळे सध्या सुरु असलेली वाहनांची वर्दळ यामुळे केलेले बीबीएम डांबरीकरण यातील खडीकरण आणि डांबर हे एकजीव होऊ शकते. आणि त्यानंतर केलेले कार्पेट डांबरीकरण अधिक मजबूत होऊ शकते.

Exit mobile version