| सुतारवाडी | प्रतिनिधी |
सुतारवाडी आणि अन्य परिसरांमध्ये मोबाईलची सुविधा उपलब्ध झाली, तेव्हा येथील परिसरामध्ये बीएसएनएलचे टॉवर होते. काही वर्ष या टॉवरने चांगली सेवा दिली. त्यामुळे हजारो कार्डधारकांनी बीएसएनएलचे सिम आपल्या मोबाईल मध्ये टाकले. मात्र, काही वर्षानंतर बीएसएनएलने कात टाकळी. त्यानंतर येथे वोडाफोन चे टॉवर उभारण्यात आले. त्यामुळे अनेक कार्डधारकांनी वोडाफोन चे सिम कार्ड टाकले. मात्र, नव्याचे नऊ दिवस या म्हणी प्रमाणे ते टॉवर सुद्धा निकामी झाले. त्यानंतर जिओची हवा पसरली आणि असंख्य मोबाईल धारकांनी जिओचे सिम पसंत करून जिओचे सिम टाकले. या टॉवरने सुद्धा आपली करामत दाखवायला अनेक महिन्यांपासून सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील वारंवार रेंज जाणे, समोरून आलेला फोन नीट ऐकायला न येणे, वारंवार एक किंवा दोन काड्या दाखविणे,,मध्येच फोन कट होणे, क्रॉस फोन लागणे अशा विविध प्रकारच्या समस्येमध्ये जिओ चे सिम धारक आहेत. सुतारवाडी, ढोकळेवाडी, दुरटोळी, गौळवाडी, कामत, सावरवाडी, येरळ, धागडवाडी, जामगाव, जाधव वाडी, पाथर शेत, कुडली, आंबिवली, खैरवाडी, वाळंजवाडी तसेच अन्य काही भागात
जिओच्या रेंजचे तीन तेरा उडाले असून जिओचे सिम धारक हैराण झाले आहेत. आता कोणता सिम कार्ड टाकायचा या विवंचनेत, अनेक जण आहेत. मुंबई ठाणे गुजरात पुणे तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये हजारो जण नोकरी निमित्त गेलेले आहेत. त्यांची खुशाली ऐकणे. त्यांना महत्त्वाचे निरोप पाठविणे. अन्य ठिकाणी रक्कम ट्रान्सफर करणे या गोष्टी वारंवार ठप्प होत असल्यामुळे अनेक सिम कार्ड धारक त्रस्त झाले आहेत.
सुतारवाडीसह तेरा वाड्यांमध्ये नेटवर्कचे तीनतेरा
