नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांसाठी डेथ वॉरंट

राकेश टिकैत यांचा आरोप
नवी दिल्ली | वृत्तंसस्था |
मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 26 जून रोजी देशभरातील राजभवनांना घेराव घालण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करत, नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांसाठी डेथ वॉरंट असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना टिकैत म्हणाले की, आंदोलनाला आता सात महिने झाले आहेत. याबाबत राज्यपालांना निवेदन देण्यात येईल. यापूर्वी टिकैत यांनी दोन ट्वीट केले होते ज्यात त्यांनी आपल्या सहकार्‍यांना हा संदेश दिला की जर पाणी, जंगल आणि जमीन वाचवायची असेल तर दरोडेखोरांविरूद्ध लढा द्यावा लागेल. दुसर्या पोस्टमध्ये ते म्हणाले होते की सरकारने तीनही कायदे रद्द करावे आणि एमएसपीवर कायदा करावा.

Exit mobile version