| उरण | वार्ताहर |
आधुनिक शहराची ओळख निर्माण करणार्या सिडकोने उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या रस्त्यांना नवा लूक प्राप्त झाला असल्याने रहिवासी, प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. आधुनिक शहराचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या सिडकोने उरण तालुक्यातील बोकडविरा, नवीन शेवा ग्रामपंचायत हद्दीतील सेक्टर 50 ते सेक्टर 55 या ठिकाणा वरील रहिवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वसाहतीमधील रस्ते चकाचक करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते निर्माण करणार्या आणि नवी मुंबई परिसरात नावाजलेल्या पी.पी. खारपाटील कंपनीला सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम दिले आहे.