१ फेब्रुवारीपासून लागू होणार ‘हे’ निर्बंध

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
1 फेब्रुवारी 2022 पासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आजपासून सुधारीत आदेश लागू केले आहे. राज्य सरकारच्या या आदेशाचा 11 जिल्ह्यांना फायदा होणार असून मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना नवे आदेश लागू केले जाणार आहेत.

डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध लागू केले होते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने राज्य सरकारनं निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे 90 टक्के आणि दुसर्या डोस घेणार्यांचे 70 टक्के लसीकरण झाले आहे. तसेच याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांचे राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

काय सुरु होणार?
नव्या आदेशाने चौपाटी, गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Exit mobile version