| उरण | वार्ताहर |
सोमटणे गावामध्ये शिवसेना सोमटणे शाखेच्या दुसर्या वर्धापदिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा सोमटणे यांच्या वतीने सोमटणे गावात समाजोपयोगी अशा नवीन मतदार नोंदणी शिबीर, नवीन आधारकार्ड व आधारकार्ड दुरूस्ती शिबिरांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना शाखा सोमटणेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या. तसेच वर्धापनदिनानिमित्त मतदार नोंदणी शिबीर व नविन आधारकार्ड व आधारकार्ड दुरूस्ती शिबिरांचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.