। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माणगाव नगरपंचायत निवडणुकीत निवडूण आलेले राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार समारंभ बुधवारी (दि.26) सायंकाळी 3 वाजता निजामपूर येथे श्रीकृष्ण राईस मैदान याठिकाणी होणार्या सोहळ्यात करण्यात येणार आहे. सदरचा सत्कार समारंभ पक्षाचे नेते तथा खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी माणगाव नगरपंचायत निवडणुकीत निवडूण आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, नगरसेविका रिया उभारे, हर्षदा सोंडकर, लक्ष्मी जाधव, रश्मी मुंढे, सुविधा खैरे, सुशीला वाढवळ व शेकापच्या नगरसेविका ममता थोरे आदी नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास तालुक्यातील पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे.







